ऍमेझॉनचे समभाग 13.5 टक्क्यांनी वाढले, बाजारमूल्यात 190 अब्ज डॉलर्सची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिकेत शेअर बाजारामध्ये कंपन्यांचा विक्रम बनला आहे. एक दिवस अगोदर जिथे मेटाचे समभागाचे भाव मोठय़ा प्रमाणात घसरले असताना दुसऱया बाजूला ऍमेझॉनचा समभाग मात्र सोमवारी विक्रमी स्तरावर 13.5 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. एक दिवसामध्ये समभागाची किमत ही सर्वाधिक राहिली आहे.
साधारणपणे ऍमेझॉनच्या समभागाची किमत सध्या आपले विक्रमी मूल्य 3,731.41 डॉलर्सच्या खाली आहे. गुरुवारी मेटाचे समभागाचे भाव हे 26 टक्क्यांनी घसरले असून बाजारमूल्य 17 लाख कोटी रुपयांनी घटले आहे. यामुळे संस्थापक मार्क झकेरबर्ग यांची संपत्ती 2.22 लाख कोटी रुपयानी एका दिवसात कमी झाली आहे.
ऍमेझॉनच्या समभागात सर्वाधिक वाढ झाली असल्यामुळे बाजारमूल्य 190 अब्ज डॉलर्सने वाढले आहे. या कारणामुळे संस्थापक जेफ बेजोस आता दुसऱया स्थानी सर्वात श्रीमंत व्यावसायिक आहेत. जेफ बेजोस यांची संपत्ती शुक्रवारी 1.41 लाख कोटी रुपयानी वधारुन 13.73 लाख कोटी रुपयांवर पोहचली असल्याची माहिती आहे.
श्रीमंतांमध्ये एलॉन मस्क अव्वल
पहिल्या नंबरवर टेस्लाचे मालक एलॉन मस्क आहेत. त्यांची संपत्ती 17.92 लाख कोटी रुपये
आहे. बिल गेट्स चौथ्या स्थानी राहिले आहेत. या वर्षात मस्क यांची संपत्ती 2.37 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
ऍपलचे बाजारमूल्य वाढले
या अगोदर 28 जानेवारी रोजी ऍपलचे बाजारमूल्य एका दिवसात 181 अब्ज डॉलर्सने वधारले आहे. आयफोनचा तिमाही अहवाल नुकताच आला होता. यामध्ये ऍमेझॉनचे बाजारमूल्य सध्या 1.6 लाख कोटी डॉलर्सचे असल्याचे म्हटले आहे. तर मेटाचे बाजारमूल्य 660 अब्ज डॉलर्स राहिले आहे.









