वार्ताहर /कडोली
खांबावरील वीजतारा तुटून शेतामध्ये असलेल्या गवतगंजीला आग लागल्याने एका शेतकऱयाचे नुकसान झाल्याची घटना बंबरगा येथे नुकतीच घडली.
विद्युत मंडळाचे वाकलेले खांब आणि लोंबकळणाऱया वीजतारांच्या प्रकाराने शेतकऱयांचे नुकसान वारंवार घडत आहे.
असाच प्रकार बंबरगा येथे घडला. खांबावरील वीजतार तुटून पिंजराच्या गंजीने पेट घेतला आणि या आगीत सदर शेतकऱयाचे सुमारे 27 हजार रुपयांचे नुकसान झाले. तेव्हा नुकसानग्रस्त मारुती भावकाण्णा मणगुतकर या शेतकऱयाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.









