5000 रुपये रोजगारभत्ता, महिलांना 1 हजार रुपये दर महिन्याला देणार
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी उत्तराखंडमध्ये बोलताना भाजप आणि काँग्रेसला लक्ष्य केले. राज्याच्या स्थापनेपासून काहीच करण्यात आलेले नाही. उत्तराखंडमध्ये कुठलाच विकास झालेला नाही. दोन्ही पक्षांच्या सरकारांकडून केवळ भ्रष्टाचार झाल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे. तसेच त्यांनी दिल्ली सरकारच्या कामांचा दाखला देत आम आदमी पक्षाकरता उत्तराखंडच्या जनतेकडून मत मागितले आहे.
मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्याच्या घोषणांमुळे राज्याच्या प्रत्येक कुटुंबाला 5 वर्षांमध्ये 10 लाख रुपयांचा लाभ होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल हे हरिद्वारच्या तीन दिवसीय दौऱयावर आहेत. केजरीवाल हे काही भागांमध्ये घरोघरी जात प्रचार देखील करू शकतात. केजरीवालांच्या दौऱयामुळे आप कार्यकर्ते उत्साहात आहेत.
केजरीवालांनी दिलेली आश्वासने
-5000 रुपये रोजगार भत्ता तसेच महिलांना 1 हजार रुपयांचा भत्ता.
-मोफत शिक्षण चांगली आणि मोफत आरोग्य सेवा
-रस्ते सुधार, तीर्थयात्रा सुविधा सर्व धर्माच्या लोकांना मिळणार
-उत्तराखंडला अध्यात्मिक राजधानी करण्याची घोषणा
-माजी सैनिकांना शासकीय नोकरी देणार
-हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांना एक कोटींचा सन्मान निधी -शिखांना कर्तार साहिबची तीर्थयात्रा मोफत घडविणार









