स्व. मनोहर पर्रिकर आधुनिक गोव्याचे निर्माते. त्यांचा वारसा भाजप आणि मुख्यमंत्री पुढे नेत आहेत
डिचोली/प्रतिनिधी
गोव्याच्या निवडणुकीत सामील झालेल्या इतर पक्षांनी भविष्यात गोव्यातील जनतेसाठी अनेक आश्वासनांची खैरात मांडली आहेत. ती पूर्ण करण्याची संधीच त्यांना मिळणार नसल्याने लोकांना ते फसवी आश्वासने देत सुटले आहे. भारतीय जनता पक्ष हा गोवा राज्यातील आपल्या कामांच्या विश्वासावर लढत असून या राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी केवळ भाजपचीच गरज असल्याची जाणीव आज लोकांना झादी आहे. स्व. मनोहर पर्रिकर हे या आधुनिक गोव्याचे निर्माते होते. आणि त्यांचाच वारसा आज भाजप आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे घेऊन जात आहे. असे प्रतिपादन भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी डिचोली येथे केले.
डिचोली येथील शेटय़? प्राईड सभागृहात डिचोली मतदारसंघातील व्यवसायिक, प्रति÷ित नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांच्यासह व्यासपीठावर सभापती तथा उमेदवार राजेश पाटणेकर उपस्थित होते.
भाजप केंद्र सरकारकडून साधनसुविधा विकासासाठी सुमारे 4 हजार कोटी रूपये राज्याला मिळाले. अशाप्रकारचा निधी यापूर्वी कधीच या राज्याला मिळालेला नाही. यापूर्वी डबल इंजिन सरकार काँग्रेस पक्षाचेही होते परंतु असा निधी मिळू शकला नाही, हे केवळ भाजप सरकारमुळेच शक्मय झाले. आज इतर पक्ष विविध योजना आणि विकास देण्याची भाषा करीत आहे. परंतु या योजना गोव्यात स्व. मनोहर पर्रिकर यांनी बऱयाच वर्षांपूर्वी आणल्या आहेत. आणि त्या आजच्या भाजप सरकारने पुढे नेल्या आहेत. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
राज्यात तृणमूल काँग्रेस पक्ष आला आणि आक्रमकपणे प्रचार सुरू केला. प्रथम या पक्षावर अनेकजण भुलले परंतु आज त्यांची निती सर्वां?ना समजली आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या राज्यात केलेल्या अन्याय आणि अत्याचार गोव्यातील जनता समजली परंतु हे मगो पक्ष समजू शकला नाही. याचे दुर्दैव आहे. मगोला जर तृणमूलची ध्येयधोरणे मान्य असल्यास त्यांना लोकांनी मते द्यावी का ? हा मोठा प्रश्न आहे. गोव्यात काही पक्ष केवळ निवडणुकीनंतर सौदेबाजी करण्यासाठीच राहतात. हि सौदेबाजी न होण्यासाठी या राज्यातील मुख्य पक्ष असलेल्या भाजप पक्षालाच साथ देत बहुमत द्यायला पाहिजे. आणि दिल्ली, बंगालहून आलेल्या पक्षांचा गाशा गुंडाळून परत पाठवणी केली पाहीजे. असेही देवेंद्र फडणवीस यां?नी यावेळी म्हटले.
डिचोली मतदारसंघात आपण यावेळी निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हतो. परंतु पक्षाच्या आग्रहाखातर आपणास उमेदवारी स्विकारावीच लागले. परंतु घरोघरी प्रचाराला प्रारंभ केल्यानंतर आपला माघार घेण्याचा निर्णय चुकीचा होता, असे समजले. डिचोली मतदारसंघात अनेक साधनसुविधा विकास झालेला आहे. डिचोलीतील सर्व रस्ते चांगले आहेत. साळ येथे येणारे वीज उपकेंद्र या मतदारसंघातील वीज व्यवस्था सुवारण्यास मदत करणार. पाण्याचा प्रश्न सोडविताना मेणकुरे पठारावर एका कुटूंबाने दान केलेल्या जागेवर दहा एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प येणार आहे. डिचोलीत बसस्थानकाचे काम सुरू आहे, अग्निशामक दलाच्या इमारतीचे, सरकारी प्राथमिक केंद्र शाळेचे, बायपास मार्गाचे, मुख्य रस्त्याच्या रूंदीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. तर येणाऱया काळात अनेक विकास प्रकल्प आणून ते पूर्ण करण्यासाठी आपण काम करणार. त्यासाठी या निवडणुकीत सर्वांचा पाठिंबा अपेक्षित आहे. असे आवाहन यावेळी सभापती तथा उमेदवार राजेश पाटणेकर यांनी केले.
यावेळी उपस्थित असलेल्या प्रति÷ित नागरिकांकडून फडणवीस यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यांची फडणवीस यांनी समर्पक उत्तरे दिली. सूत्रसंचालन डॉ. शेखर साळकर यांनी केले तर आभार नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी मानले.









