मुंबई
विमा क्षेत्रातील भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीचे चेअरमन एम. आर. कुमार यांचा कार्यकाळ सरकारने एक वर्षाने वाढवला आहे.
देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीला शेअर बाजारात लिस्टींगसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरकारने त्यांना मुदतवाढ दिली आहे. याव्यतिरीक्त व्यवस्थापकीय संचालक राजकुमार यांचा कालावधीही 1 वर्षाने वाढवला आहे. चेअरमनना ही दुसऱयांदा मुदतवाढ मिळाली आहे. मागच्या जूनमध्ये त्यांना आयपीओच्या कारणास्तव 9 महिन्यांची मुदतवाढ दिली होती.









