गाकुवेध संघटनेची पत्रकार परिषदेतून मागणी : ‘उटा संघर्ष- गोव्याच्या आदिवासींचा दगदगता इतिहास’
प्रतिनिधी /फोंडा
शिक्षण सहाय्यक संचालक डॉ उदय गावकर लिखित ‘उटा संघर्ष’-गोव्याच्या आदिवासीचा दगदगता इतिहास हे पुस्तक अनुसुचित जमातीचा इतिहासाला जोडणारे हा लेखकाचा दावा सपशेल खोटा आहे. सदर पुस्तकाची रचना उदय गावकर यांनी आपल्या आत्मकेंद्री संकल्पनेतून केलेली आहे. आजच्या युवकासमोर अनुसुचित जमातीचा खोटा इतिहास मांडणाऱया या पुस्तकाची पुढील आवृत्तीची छपाई तात्काळ रोखावी अशी मागणी केली आहे. आक्षेपार्ह पुस्तकाची पुढील आवृत्ती बाजरात आणल्यास गंभीर परिणाम सोसावे लागेल असा इशारा गाकुवेध संघटनेचे पादाधिकारी श्रीकांत पालसरकर यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी गाकुवेध संघटनेचे पदाधिकारी गोविंद शिरोडकर, पांडुरंग कुंकळकर, गजानन रायकर, दिलीप पालसरकर, ज्ञानेश्वर घाडी, कृष्णदास शिरोडकर, संतोष वेलिंगकर, रूपेश वेळीप, रामकृष्ण जल्मी उपस्थित होते. पुस्तकातील अनेक मजकूर आक्षेपार्ह असून प्रकाश शंकर वेळीप हे आदिवासी समाजाला एसटी दर्जा मिळविण्यासाठी कोणतेच प्रयत्न केलेले नाही. एसटी दर्जा मिळण्याच्या प्रयत्नावेळी प्रकाश वेळीप यांनी आदिवासी समाज अतिमागासलेला असल्याचा दावा करून त्याला एसटी दर्जा मिळू नये यासाठी प्रयत्न करणाऱयाला लेखकाने उदोउदो केलेला आहे. परंतू ज्यावेळी केंद्र सरकाराकडून एसटी दर्जा मान्यता मिळाली त्यावेळी प्रथमदर्शनी एसटी कमिशनर म्हणून प्रकाश वेळीप हे पद भोगण्यास पुढे सरसारवले होते असा आरोप केला.
गोव्य़ातील एसटी समाजाचा इतिहास म्हणून पुस्तकाकडे बघू नये
डॉ. उदय गावकर यांनी आपल्या एसटी समाजाला धगधगता इतिहास पुस्तकरूपात आपले आत्मकथा स्वरूपात लिहिलेले आहे. आपल्यासह पुस्तकाची प्रस्तावना लिहिणाऱया प्रकाश शंकर वेळीप यांचा उदोउदो केलेला आहे. प्रकाश वेळीप हे समाजात फूट पाडणारे नेते आहेत. लेखकाने सदर पुस्तकात 254 वेळा स्वतःबद्दल उल्लेख केलेला आहे. एसटी समाजाचा इतिहास म्हणून नवसंशोधनाला उपयुक्त म्हणवून घेणाऱया पुस्तकाची योग्यता तपासणे तेवढेच गरजेचे आहे. गोव्यातील एसटी समाजाचा इतिहास म्हणून कुठेच या पुस्तकाची नोंद होऊ नये अशी मागणी गाकुवेधच्या पदाधिकाऱयांनी केली आहे.
समाजाचा इतिहास लिहिताना ज्येष्ठ नेत्य़ाचा विसर
इतिहासरूपी पुस्तक असल्यास समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून डॉ. काशिनाथ जल्मी यांचा तसूभरही उल्लेख पुस्तकात कुठेच का आढळत नाही? त्याचबरोबर बुधो कुट्टीकर, बाबुसो गावकर, रमेश तवडकर यांचेही योगदान कुठेच आढळत नाही. समाजाचा इतिहास संशोधनात्मक बाजू सांभाळून अभ्यासाअंती प्रस्तूत करावा अशी मागणी केली आहे. सदर पुस्तकात नमूद केलेला इतिहास हा एसटी बांधवांचा इतिहास नसून लेखकांनी दिलेली चुकीच्या माहिती पुरविल्याबद्दला त्यानी पुस्तकांच्या मुद्रणासाठी असलेल्या प्रती माघारी घ्यावी. अभ्यासाअंती चुकांचे निवारण करून सुधारीत आवृत्ती काढल्यास स्वागतार्ह असल्याचे म्हटले आहे.
एसटी समाजाचा इतिहास लिहिताना लेखकांने संदर्भसुची अनिवार्य हा नियम पाळलेला नाही. संदर्भसुची नसलेल्या पुस्तकाला इतिहास संबोधू नये असे आवाहन गाकुवेधच्या पदाधिकाऱयांनी केले आहे. इतिहास म्हणून मान्यता मिळविण्यासाठी पुस्तकाला सशोधन, संदर्भसुची, समाजाच्या ज्येष्ठाकडून माहिती संघटीत करणे अनिवार्य असते. सदर पुस्तक नवीन पिढीला दिशाभूल करणारे आहे. आजच्या युवकाला दिशाभूल करणाऱया पुस्तकाची पुढील आवृत्तीची छपाई झाल्यास ती रोखण्यात येईल असा ईशारा यावेळी देण्यात आला.









