गायन व अभिनय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करणाऱया केतकी माटेगांवकरनं आता संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘मला संगीताच्या माध्यमातून व्यक्त व्हायला आवडतं. माझ्यासाठी हा योग्य मार्ग आहे. एखाद्या गाण्याकडे, चालीकडे पाहण्याचा एका स्त्राr संगीतकाराचा एक वेगळा दृष्टिकोन या निमित्तानं श्रोत्यांना अनुभवता येईल,’ असं केतकीनं आपल्या नव्या इनिंगविषयी सांगितलं. संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, मीना खडीकर, उषा खन्ना आणि अलीकडच्या काळात वैशाली सामंत या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला संगीतकार डोळय़ासमोर येतात. हे चित्र बदलावं आणि संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी काही प्रमाणात तरी संगीत दिग्दर्शन क्षेत्राकडे वळावं, असंही मत तिनं नमूद केलं. केतकीनं संगीतबद्ध केलेल्या पहिल्याच अल्बममध्ये महालक्ष्मी अय्यर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, रघुनंदन पणशीकर आणि सुवर्णा माटेगांवकर या कलाकारांनी गायन केलं आहे. यामध्ये दोन भागात नऊ गाणी असतील. केतकीची पणजी सौदामिनी माटेगांवकर अर्थात माई यांच्या रचना यामध्ये संगीतबद्ध केल्या असून, धार्मिक, सकारात्मक, भक्तीमय भाव हे याचे वैशिष्टय़ आहे.
Previous Articleमोबाईल, हिरे स्वस्त, आयात छत्री महाग…
Next Article हिरे, खडय़ांवरील आयात करात कपात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









