मिरज / प्रतिनिधी
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास एक वर्षात दामदुप्पट करुन देतो, असे अमिष दाखवून शहरातील एका हॉटेल चालकाला दोघा भामट्य़ांनी तब्बल चार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुनिल श्रीपती तिपले (वय 53, रा. कुपवाड रोड, टीळकनगर, सांगली) असे फसवणूक झालेल्या हॉटेल चालकाचे नांव आहे. याबाबत त्यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, अक्षय अनिल कांबळे (रा. सांदळे, जि. कोल्हापूर) आणि रविंद भोलानाथ देवणे (रा. वडवणे, जि. कोल्हापूर) या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.









