ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पाकव्याप्त काश्मीर संदर्भात एक महत्वपूर्ण विधान केलं आहे. त्यांनी “२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येऊ शकतो असं म्हंटल आहे. ते कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टातर्फे स्वर्गीय राम कापसे व्याख्यानमालेमध्ये बोलताना त्यांनी पाकव्याप्त काश्मीरविषयी विधान केलं.
दरम्यान, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काश्मीरचा मुद्दा हा नेहमीच वादाचा राहिलेला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून कायम तणाव राहिलेला आहे. त्यात पाकव्याप्त काश्मीरचा भाग अजूनही भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दावे केले जातात. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात बोलताना २०२४पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येऊ शकतो असं महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
व्याख्यानमालेमध्ये बोलताना कपिल पाटील यांनी २०२४पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच, आता आपण कांदे, बटाटे, तूरडाळ यातून बाहेर पडलं पाहिजे, असं देखील कपिल पाटील म्हणाले आहे.
कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टातर्फे स्वर्गीय राम कापसे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेमध्ये बोलताना कपिल पाटील यांनी पाकव्याप्त काश्मीरविषयी विधान केलं. त्यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरसिंहराव पंतप्रधान असताना संसदेच्या संयुक्त अधिवेशनात पारीत केलेल्या कायद्याचा उल्लेख केल्याचा संदर्भ देखील त्यांनी यावेळी दिला.