अनेकदा कुणी अचानक समोर आल्यास आपण घाबरून जातो. ब्रिटनमध्ये सध्या एक झॉम्बी सर्वांना शॉक देत आहे. हा खराखुरा झॉम्बी नसून वेल्समध्ये जंगलांमधून जाणारे लोक अचानकपणे या भीतीदायक पुतळय़ाला झुडुपांमधून डोकावताना पाहून घाबरत आहेत.
या झॉम्बीने पिवळय़ा रंगाचा रेनकोट घातलेला असून त्यावर डोक्यावर एक टोपी आहे. उत्तर वेल्सनजीक बॉडेलविड्डेनच्या झाडांमधून तो दिसतो. जर अचानक येथून कुणी जात असेल तर तो घाबरून जातो, कारण हा झॉम्बी लोक येत असलेल्या दिशेकडेच पाहत असतो. हा पुतळा अखेर जंगलात पोहोचला कसा याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

हातात सुटकेस
या पुतळय़ाच्या हातात एक सूटकेस असून त्याचे लांब काळे केस आहेत. डोळय़ांवर चष्मा देखील लावलेला आहे. त्याच्या हातावर ‘थँक यू’ असा संदेश लिहिलेला आहे. जॅन्नी पॅन हे त्याच परिसरात राहतात, त्यांनी याची छायाचित्रे फेसबुकवर शेअर केली होती.
दोन वर्षांपूर्वी त्यांनी हा भीतीदायक पुतळा पाहिला होता. त्यांनी यासंबंधी पोलिसांना फोन करून कळविले होते. तर याबद्दल पूर्वीपासून माहित असल्याचे उत्तर पोलिसांनी दिले होते.









