पर्वरी /(प्रतिनिधी )
येथील पिडीए कॉलनीतील एका बंगल्यावर छापा टाकून तेथे बेकायदेशीररीत्या सुरु असलेल्या ऑनलाईन पोकर गेमिंग पर्वरी पोलिसांनी उद्धावस्थ केले आहे.या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांची रोख रक्कम तसेच मोबाईल व अन्य साहित्य मिळून सुमारे पंचवीश लाखांचा मुद्दे माल जप्त केला आहे.
या आठवडय़ात पर्वरी पोलिसांनी केलेली ही दुसरी मोठी धाड आहे.पोलिसांनी या प्रकरणी शशांक सिंग (पटणा,बिहर),रजनीश कुमार (बिहार) आणि अनुप पलोड (मध्य प्रदेश) यांना अटक केले आहे.
या संबंधीचे सविस्तर वृत्त असे की येथील पिडीए कॉलोनीतील एका बंगल्यात ऑन लाईन गेमिंग सुरु असल्याची माहिती पोलिसांना खबऱयाकडून मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली त्या घरावर धाड घालून शशांक सिंग (पटणा,बिहर),रजनीश कुमार (बिहार) आणि अनुप पलोड (मध्य प्रदेश) या तिघांना रंगेहात पकडले आहे.तसेच त्यांचाकडून मोबाईल, लेपटोप,गेमिंग चीप आणि इतर एकूण वीस लाखांच्या वस्तू जप्त केल्या आहेत.तसेच साडेपाच लाख रोख रक्कम जप्त केली आहे.हे लोक देशातील गुप्त माहिती दुसऱया देशाला पुरवीत असत.त्यामुळे देशाच्या सुरक्षितेला धोका पोचू शकतो.तसेच अशा बेकायदेशीर कामामुळे लाखो रुपयांचा कर बुडवला जातो.पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक सीताराम मळीक यांनी भा.द.क्र. 420,408,120 ब कलाम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे.ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शना खाली झाली असून त्यांना उपनिरीक्षक सीताराम मळीक,पोलीस महादेव नाईक,उत्कर्ष देसाई,नेहा देसाई ,नारायण साळगावकर यांनी सहाय केले.









