दापोली / प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे तीन वयोवृद्ध महिलांचा खून करणारा केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी गावातील चंद्रकांत वामन शिंदे, वय- 53 याच्या मुसक्या आवळल्या आहेत. कर्जबाजारी झाल्याने व पैशांची गरज असल्याने तीन महिलांना हेरून त्यांचा खून करून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
ही घटना 14 जानेवारी रोजी उघडकीस आली होती या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या बद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.