”डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू”
ऑनलाईन टीम / गोवा
गोवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून नेत्यांकडून देखील एकमेकांवर शेरेबाजी सुरुच आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपाने उत्पल पर्रिकर यांच्याबाबत घेतलेली भुमिका आणि उत्पल पर्रिकर यांनी भाजपवर नाराजी व्यक्त करत अपक्ष लढण्याची घेतलेली भुमिका घेतली आहे.
यावरुन खासदार राऊत यांनी निशाणा साधत उत्पल पर्रिकर यांनी काल भाजपला सोडचिठ्ठी दिल्यावरूनही भाजपवर टीका केली आहे.
यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी उत्पल पर्रिकर यांची वेदना मी समजून घेऊ शकतो. ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला, तो पक्ष सोडताना किंवा त्या पक्षापासून दूर जाताना कशा वेदना होतात, हे मी काल त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवलेलं आहे.
असे ही ते यावेळी म्हणाले. पण तरी ही उत्पल पर्रिकर यांना राऊत यांनी पुढील राजकिय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.” तसेच, डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे. असंही यावेळी त्यांनी भाजपाला प्रत्युत्तर देताना बोलून दाखवलं.
उत्पल पर्रिकरांच्याच बाबतीत घराणेशाही कशी आडवी आली ?
गोवा विधानसभा रणधुमाळी आता सुरु झाली असुन राजकिय नेत्यांच्या ही फैरी झडत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज गोवा विधानसभेच्या अनुशंगाने तीसरी यादी जाहीर करण्यात आली. यात ९ उमेदवारांची आता पर्यंत नावे जाहीर केली आहेत. यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी भाजपचे दिवंगत नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या मुद्यावरुन उत्पल पर्रिकरांच्याच बाबतीत घराणेशाही कशी आडवी आली ? असा खोचक सवाल उपस्थित करत भाजपवर ताश्चर्य ओढले आहे.