डॉ. श्रीनिवास पाटील यांचा पुढाकार
प्रतिनिधी /बेळगाव
पोलीस दलात कोरोना बाधितांची संख्या वाढती आहे. यामुळे त्यांच्यातील प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉ. श्रीनिवास पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे शुक्रवारी सायंकाळी आयुर्वेद औषधे सुपूर्द केली.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱया लाटेच्यावेळी येथील प्रोजेन रिसर्च लॅबचे डॉ. श्रीनिवास पाटील यांनी पोलिसांसाठी मोफत औषधे पुरविली होती. सेवा कार्यात काम करणाऱयांच्या आरोग्य रक्षणासाठी मदत व्हावी म्हणून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांची भेट घेवून त्यांच्याकडे आयुर्वेद औषधे सुपूर्द केली. यावेळी गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी उपस्थित होते. कोरोना बाधित झालेल्या पोलीसांच्या आरोग्य रक्षणासाठी औषधे पुरविणारे डॉ. श्रीनिवास यांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले.









