ऑनलाईन टीम / गोवा
गोवा विधानसभा निवडणूक बाबत भाजपने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने गोव्यातील सर्व जागा लढणार असलो तरी सद्या ३४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली आहे. मुख्यत: गोवा काँग्रेसने आपली सत्ता असताना भ्रष्टाचार केला असून याची कित्येक उदाहरणे गोवा नागरीकांनी आपल्या डोळ्यांनी पाहीली आहेत. तसेच गेल्या दहा वर्षांपासून भाजपने गोवा नागरीकांना स्थिरतेचं सरकार दिले आहे. तसेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यापासून ते सद्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पर्यंत गोव्याला सामान्य माणसाला अपेक्षित असणारा विकास केला आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
मात्र दुसऱ्या बाजूला इतर पक्ष गोव्यातील पक्ष भ्रष्टाचाराने ग्रासले आहेत. गोवा काँग्रेस तर कित्येक दिवस भ्रष्टाचाराची साखळी तुटता तुटत नाही. असे ही ते यावेळी ते म्हणाले. तसेच काँग्रेसच्या काळात प्रत्येक दिवस हा नवा भ्रष्टाचार उघडणारा होता. असेही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
भाजपच्या ३४ मतदारसंघातील उमेदवार जाहीर
आज भाजपच्या ३४ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीतून उमेदवारीचे प्रबळ दावेदार इजिदोर फर्नांडिस व दीपक पाऊसकर यांना डावलले गेले आहे. तर इजिदोरच्या जागी रमेश तवडकर यांना तर पाऊस्कर यांच्या जागी गणेश गावकरी यांना दिली संधी दिली गेली आहे. तसेच मोन्सेरात व राणे दाम्पत्याला म्हणजेच दिव्या राणे व विश्वजित राणे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच मिलिंद नाईक व बाबू आजगावकर यांची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.