प्रतिनिधी / सातारा :
मागील दिवसांपूर्वी राजवाडा बसस्थानकातील शिवसमर्थ शिल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. पण संभाजी ब्रिगेड आणि विद्रोहीच्या काही कार्यकर्त्यांनी या शिल्पास प्रखर विरोध केला होता. तसेच हे शिल्प त्वरीत हटविण्यात यावे, अन्यथा आम्ही हटवू असा इशारा श्रीमंत कोकाटे, पार्थ पोळके यांच्यासह कार्यकत्यांनी दिला होता. याची दखल घेत हे शिल्प एसटी महामंडळाकडून झाकून ठेवण्यात आले आहे.
या शिल्पातून छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांचे प्रतिबिंब दाखविण्यात आले होते. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नसून खोटा इतिहास दाखवुन नागरिकांची दिशाभुल करू नका, असे सांगत कार्यकर्त्यांनी वादग्रस्त असलेले हे शिल्प त्वरीत हटविण्याची मागणी केली होती. बुधवारी हे चित्र संबंधीत विभागातर्फे झाकुन ठेवण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून हे शिल्प झाकुन ठेवण्यात आल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.