सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी तालुक्यात कोरूना च्या तिसर्या लाटेत रुग्ण संख्या आहे असे असताना सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात समर्पित कोविड सेंटर सुरू करण्यास टाळाटाळ का केली जात आहे. तालुक्यात वयोवृद्ध तसेच पंचेचाळीसच्या वरील विविध व्याधीतील रुग्ण सध्या तिसऱ्या लाटेचा मिळत आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाची गरज आहे, असे असतानाच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य प्रशासन कोरोनाचे रुग्ण नाही म्हणून सांगून येथे समर्पित सेंटर सुरू करत नाहीत याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आपण लक्ष वेधले आहे, त्यांनी सावंतवाडी तालुक्यात रुग्णालयात उपचार करण्यासारखे उपचार घेण्यासाठी रुग्णालयाकडे रुग्ण येत नाहीत. असे स्थानिक प्रशासनकडून सांगण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. परंतु जर रुग्ण असतील तर निश्चितपणे ते समर्पित सेंटर सुरू करण्याच्या सूचना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली.
मी स्वतः कोरोना रुग्ण आहे असे असताना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य विभाग रुग्णच नाहीत असे का सांगते आहे, असा सवालही त्यांनी केला. सावंतवाडी शहर व तालुक्यात गावागावात वयोवृद्ध तसेच पन्नासच्या वरील काही जणांना अन्य व्याधी आहेत, कोरोना बाधित आहेत, त्यांना होम आयसोलेशन ठेवून त्यांच्यावर उपचार कसे होतील त्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू होणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रामभरोसे कारभार सुरू आहे असेही भोसले म्हणाले









