प्रतिनिधी /बेळगाव
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा 342 वा राज्याभिषेक दिन रविवारी संभाजी चौक येथे साजरा करण्यात आला. धर्मवीर संभाजीराजे उत्सव व धर्मवीर संभाजीराजे सुशोभिकरण समितीच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अनिल बेनके यांनी संभाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. उत्सव समिती अध्यक्ष सुनिल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी प्रसाद मोरे, श्रीनाथ पवार यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.









