प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ येथील सिद्धकला युथ क्लब यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिराजी वासुदेव होते. यावेळी दीपप्रज्वलन मनोज पुंभार व चंद्रकांत कडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन फोंडू सुतार, श्रीकांत पाटील, गणेश प्रभू व जयंत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वास पवार यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाबाबत माहिती दिली. स्वामी विवेकानंद फलकाचे अनावरणदेखील शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गजगेश्वर यांनी केले. आभार सिद्धकला युथ क्लबचे अध्यक्ष अरुण गावडे यांनी मानले. या कार्यक्रमाला मुरली पाटील, अभिषेक मावीनकट्टी, अरविंद पालेकर, रामा पाटील, शेखर कुलकर्णी, शिवानंद दुर्गण्णावर, वैभव गावडे, उदय लोहार, नागेश कंग्राळकर, अनिल बांदेकर, दिनेश आनंद व सिद्धकला युथ क्लबचे सदस्य उपस्थित होते.









