भारतीय वायुदलाचे विधान : जनरल बिपिन रावत यांचा ओढवला होता मृत्यू
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोसळल्याचे भारतीय वायुदलाने एक विधान जारी करत शुक्रवारी म्हटले आहे. वायुदलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत.
कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या निष्कर्षांमध्ये हेलिकॉप्टरमध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड, निष्काळजीपणा किंवा कुठल्याही प्रकारच्या कटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. अचानक ढग दाटून आल्याने हवामानात बदल झाला आणि यातून दुर्घटना घडल्याचे वायुदलाकडून म्हटले गेले.
ट्राय सर्व्हिस कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये पथकाने हेलिकॉप्टरच्या कॉकपिट व्हॉइस रिकॉर्डर आणि फ्लाइट डाटा रिकॉर्डरच्या तपासणीसह प्रत्यक्षदर्शींकडून माहिती जमविली आहे. तपास पथकाने काही सूचना केल्या असून त्यांची समीक्षा केली जात आहे.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये तामिळनाडूच्या कुन्नूरनजीक भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि काही अन्य सैन्याधिकारी प्रवास करत होते. या दुर्घटनेत या सर्वांचा मृत्यू ओढवला होता.









