ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय नौदलाने मंगळवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पश्चिम किनाऱ्यावर तैनात असलेल्या विशाखापट्टणम या लढाऊ युद्धनौकेतून हे मिसाईल प्रक्षेपित करण्यात आले.
या क्षेपणास्त्राची ही समुद्रातून समुद्रात मारा करणारी आवृत्ती असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले. चाचणी दरम्यान, ते अचूकतेसह जास्तीत जास्त श्रेणीतील लक्ष्य गाठत जहाजावर आदळले. यापूर्वी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या हवाई आवृत्तीची डिसेंबरमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.