महापालिकेच्या 11 आरोग्य केंद्रात आजपासून बुस्टर डोस
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोरोनाची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हेल्थ केअर वर्कस, प्रंट लाईन वर्कस आणि 60 वर्षावरील व्याधीग्रस्तांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सोमवारपासून बुस्टर डोस दिला जाणार आहे. शहरामध्ये 8 हजार 146 नागरिक यास पात्र आहेत.
कोरोनाचे रूग्ण पुन्हा मोठया संख्येने आढळून येत आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला आहे. आरोग्य विभागात काम करणारे तसेच 60 वर्षावरील व्यधीग्रस्तांना कोरोनापासून बचाव होण्यासाठी शासनाने त्यांना बुस्टर म्हणजे तिसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. आज, सोमवारपासून राज्य बुस्टर डोस देण्यात येत आहे. कोल्हापूर महापालिकेनेही 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात बुस्टर डोस देण्याचे नियोजन केले आहे.
यामध्ये हेल्थ वर्कस, प्रंट लाईन वर्कर्स, 60 वर्षावरील व्याधीग्रस्तांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे. दुसरा डोस घेऊन 9 महिने अथवा 39 आठवडे होणे आवश्यक आहे. जी लस पहिला आणि दुसरा डोसवेळी घेतली तीच बुस्टरसाठी दिली जाणार खासगी रूग्णालयातही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात पुन्हा लसीकरणासाठी रांगा लागल्या आहेत. रविवारी दिवसभरात 6 हजार 689 नागरिकांना लस देण्यात आली. यामध्ये 15 ते 18 वर्षातील 3801 युवकांचा समावेश आहे. तसेच 18 ते 45 वर्षातील 580 नागरकि तर 60 वर्षावरील 223 नागरिकांनी लस घेतली. कोव्हॉक्सीनची लस उपलब्ध नसल्याने अनेकांना माघारी परतावे लागले.