ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या खासगी सचिवासह कार्यालयातील 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापूर्वी कार्यालयातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर इतर कर्मचाऱयांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कार्यालयातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 झाली आहे.
दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील आणि बंगल्यावरील 22 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचीही माहिती मिळत आहे.