दाभोळ सागरी पोलीसांची उलेखनिय कामगिरी
प्रतिनिधी/दापोली
मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याऱया चोरटय़ाला दापोली तालुक्यातील दाभोळ पोलीसांनी केवळ तीन तासातच गजाआड केले आहे. त्यामुळे दाभोळ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक होत आहे.
दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पुजा हिरेमठ यांनी व त्यांच्या सहकार्यांनी सदर मंदीराचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदर चोरटा हा मौजे उसगाव मधलीवाडी येथील रा†हवाशी असल्याचे समोर आले. राजेंद्र लक्ष्मण धोपट वय -55 वर्ष रा. उसगाव मधलीवाडी दापोली असे असल्याचे निषपन्न झाले. सदर चोरट्य़ास सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्यानंतर केवळ तीन तासांचे आत मोठय़ा शिताफीने दाभोळ सागरी पोलीसांनी ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी ही रत्नागिरी पोलीस अधीक्षक, अफ्पर पोलीस अधीक्षक, खेड अधीक्षक पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सपोनि पुजा हिरेमठ व त्यांचे सहकारी आर. बी. मोहिते, एस. आर. शिंदे, आर. एन. ढोले, एस.बी.कांबळे, जानवलवकर, कोळथरकर, देशमुख यांनी सदर गुन्ह्याचेकमी उलेखनिय कामगिरी केलेली आहे. तसेच सदर गुह्याच्या तपासकामी दाभोळ पोलीसांना मौजे उसगाव गावचे सरपंच चेतन रामाणे व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.