ऑनलाईन टीम/ तरारून भारत
देशात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आगामी 5 राज्यांतील निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. निवडणूक आयोगही यासंदर्भात बैठक घेत आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे या निवडणुका होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि निवडणूक आयोगामध्ये अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या आहेत. यामध्ये निवडणूक घेण्यात येणाऱ्या राज्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. आयोगाकडून त्या राज्यांमध्ये सर्वेक्षणही कऱण्यात आले आहे. त्यामुळे आता येत्या दोन दिवसांमध्येच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका 8 टप्प्यात घेण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता आहे.