सिडनी / वृत्तसंस्था
ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 3 बाद 126 धावा जमवल्या. सातत्याने पावसाचा व्यत्यय आल्याने या लढतीत पहिल्या दिवसात अवघ्या 46.5 षटकांचा खेळ होऊ शकला. डेव्हिड वॉर्नर (30), मार्कस हॅरिस (38), लाबुशाने (28) स्वस्तात बाद झाले तर स्टीव्ह स्मिथ (नाबाद 6), उस्मान ख्वाजा (नाबाद 4) क्रीझवर राहिले. इंग्लंडतर्फे अँडरसन, ब्रॉड व मार्क वूड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









