सांबा / वृत्तसंस्था
बीएसएफने सोमवारी सकाळी झीरो लाईन गस्तीदरम्यान जम्मूतील सांबा सेक्टरमधून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि हेरॉईनचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईमधून लष्कराने दहशतीचा मोठा कट उधळून लावला आहे. बॉर्डर पोस्ट 35 जवळ आयबीवरील झुडपात सदर शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ लपवून ठेवण्यात आली होती. सुरक्षा जवानांनी या भागात दिवसभर विशेष मोहीम राबवत अन्यत्रही शोधाशोध केली. मात्र, अधिकचा मुद्देमाल किंवा कोणीही संशयित सापडू शकला नाही.









