प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज सोमवार दि. 3 जानेवारी रोजी गोव्यात येत असून सायं. 5 वा. सिदाद – गोवा दोनापावला येथे त्या करिता विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. तेथे ते खास उपस्थित राहाणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्य पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, खासदार विनय तेंडुलकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन हे हजेरी लावणार आहेत.









