–मागील 2 महिन्यांपासून शहरवासियांचे हाल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामधील सर्व विभागातून एसटी फेऱया सुरू करण्यात यश आल्यानंतर आता रत्नागिरीत शहर बससेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ मागील 2 महिन्यांपासून शहर बससेवा सुरू नसल्याने शहर व आजूबाजूच्या परिसरात राहणाऱया प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आह़े शहरवासियांना दिलासा देण्यासाठी रेल्वेस्टेशन ही बस सुरू करण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी 8 नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत़ या दिवसांपासून रत्नागिरी शहर बससेवा बंद ठेवण्यात आली आह़े आता जवळपास 700 कर्मचारी कामावरव हजर झाल्यानंतर बससेवा काही प्रमाणात सुरू करण्यात आली आह़े याचाच भाग म्हणून शहर बससेवाही काही प्रमाणात सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आह़े यामुळे नियमित कामावर जाणारे व शाळा, कॉलेजमधील मुलांना या बससेवेचा लाभ होणार आह़े
रविवारी जिह्यात एसटीच्या 350 हून अधिक फेऱया सोडण्यात सेडण्यात आल्य़ा जिह्यात आता एकूण 700 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ असे असले तरी चालक-वाहक कामावर हजर रहावेत, यासाठी एसटीच्या अधिकाऱयांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत़ वारंवार या संदर्भात कर्मचाऱयांशी बोलणी करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कर्मचाऱयांच्या बदल्याही करण्यात येत आहेत़ तसेच संपावर असलेल्या निलंबित कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानुसार सोमवारी या कर्मचाऱयांवर कोणती कारवाई करणार, याकडेही लक्ष लागून राहिले आह़े









