ग्रंथपाल कर्मचाऱयांचा इशारा
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील विविध विद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम करीत असलेल्या कर्मचाऱयांची परिस्थितीत बिकट बनली असून गेल्या सात महिन्यापासून वेतनच मिळत नसल्याचे साईश कुडतडकर यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांना अनेकदा निवेदनाद्वारे कळविण्यात आले मात्र त्याच्याकडे गांर्भीयाने बघितले जात नसल्याचे ते म्हणाले. दोन जानेवारी पर्यंत मागण्या मान्य न केल्यास 2 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्याच्या आल्तीनो येथील शासकीय बंगल्यावर जाणार असल्याचेही साईजीत कुडतडकर यांनी सांगितले.
काल गुरुवारी येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत साईजीत कुडतडकर बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत लिना फर्नांडिस, श्रीधर फडते व अन्य लोक उपस्थित होते. पर्रीकर सरकारच्या काळात 14 हजार रुपये पगारावर आम्हाला ग्रंथपाल म्हणून कंत्राटी पध्दतीवर नोकरीत घेण्यात आले होते. दर अकरा महिन्यांनी आमचे कंत्राट वाढविले जात होते. गेल्या सहा वर्षापासून आमच्या पगारात वाढ झालेली नाही. आजची महागाई आणि आम्हाला मिळत असलेला पगार याचा ताळमेळ बसत नाही असेही साईजित कुडतडकर यांनी सांगितले. 2019 सालात पगारवाढीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. मात्र अद्याप काहीही झालेले नाही. आता निवडणूका जवळ आलेली असून आतातरी आम्हाला पगारवाढ देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. वास्तविक अम्हाला नोकरीत रुजूकरून घेतले होते तेव्हा सहावे वेतन आयोग लागू झाले होते त्यानंतर आता सातवे वेतन आयोग लागू झाले असल्याने आमची पगारवाढ ही सातवे वेतन आयोगाप्रमाणे व्हावी. काम करूनही आम्हाला वेळेवर पगार मिळत नसून दरमहा वेळेवर पगार देण्यात यावा. दर अकरा महिन्यानी आमचे कंत्राट वाढवले जाणार की नाही याची भिती आमच्या मनात कायम असते. त्यामुळे आमच्या नोकरीची सुरक्षीत आम्हाला मिळावी यासाठी आम्हाल नोकरीत कायम करावे अशा विविध मागण्यांची गेल्या कित्येक वर्षापासून आम्हा मागणी करीत आहोत. सरकारने या आमच्या मागंण्या त्वरीत मान्य कराव्या असेही साईजीत कुडतडकर यांनी सांगितले.









