53 शहरांसाठी लावली बोली : पाईपलाइनमार्फत गॅस
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
शहरांतर्गत स्वयंपाक गॅस वितरण परवान्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) आणि अदानी टोटल गॅस यांनी मोठी बोली लावली असल्याचे समजते. कदाचित यांना हे कंत्राट मिळण्याची चिन्हे दिसताहेत.
देशभरातील शहरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचे वितरण आता पाईपलाइनमार्फत घरोघरी केले जात आहे. याअंतर्गत विविध शहरांमध्ये खरे तर काम सध्या सुरू आहे. आता योजनेच्या क्याप्तीत आणखी शहरे अंतर्भूत केली जाणार आहेत. यावेळी पाईपलाइन वितरणासाठी लावल्या गेलेल्या बोलीत आयओसी व अदानी यांचा वरचष्मा राहिला आहे. अदानी ग्रुपने शहर गॅस वितरणाच्या व्यवसायामध्ये आयओसीबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून शहरांमध्ये गॅसचे पाईपलाइनद्वारे वितरण करण्याची प्रक्रिया राबवले जाईल.
53 शहरांमध्ये पुरवणार सेवा
या नव्या भागीदारी अंतर्गत दोन्ही कंपन्यांकडून 61 पैकी 53 शहरात पाइपलाइनच्या माध्यमातून गॅसचे वितरण करण्यासाठी दोघांनी बोली लावली असल्याचे समजते. गेल्या 15 डिसेंबरला परवानगीसंदर्भात 11 व्या फेरीची बोली पार पडली.









