ऑनलाईन टीम/तरुण भारत
तीनही वादग्रस्त कृषी कायदे केंद्र सरकारने गेल्या महिन्यात रद्द केले. यानंतर संसदेत विधेयक मंजूर केले. त्या नंतरच आंदोलक शेतकरी पुन्हा आपल्या घरी परतले. त्यानंतर शनिवारी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना हे कृषी कायदे परत आणले जाऊ शकतात, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांकडून केंद्रीय कृषीमंत्र्यांवर चांगलीच टीका केली. पुढच्या वर्षी पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर केंद्र सरकार रद्द केलेले वादग्रस्त कायदे परत आणणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला. याच दरम्यान तोमर यांनी ,”मी असं काहीही बोललेलो नाही. मी म्हणालो होतो की सरकारने चांगले (शेती) कायदे तयार केले होते. पण आम्ही काही कारणांमुळे ते परत घेतले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत राहील,” असं त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं.