प्रतिनिधी/ फोंडा
अग्नीशामक दलाचे फायर फायटर सईद अमजद यांना मुख्यमंत्री अग्नीशामक सेवा पदक प्राप्त झाले असून पणजी येथे झालेल्या हिरकमहोत्सवी मुक्तीदिन सोहळय़ात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते त्यांना हे पदक बहाल करण्यात आले.
सईद गेल्या 14 वर्षांपासुन अग्नीशामक दलात कार्यरत असून पणजी येथील मुख्यालयाबरोबरच फोंडा अग्नीशामक केंद्र व मडगाव अग्नीशामक केंद्रात त्यांनी सेवा बजावली आहे. प्रशासकीय कार्यातील कौशल्य, प्रामाणिक व तत्पर सेवेबद्दल त्यांना हे पदक बहाल करण्यात आले आहे. यापूर्वी 2008मध्ये फोंडा येथे पाण्यात बुडालेल्या एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिल्याबद्दल त्यांना साहसपदक देऊन गौरविण्यात आले होते.









