ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत नवा पक्ष स्थापन करणारे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी राज्यातील काँग्रेसच्या आमदारांवर गंभीर आरोप केला. त्यांनी काँग्रेसचे सर्व आमदार वाळूच्या अवैध व्यापारात गुंतले असल्याचा आरोप केला. परंतु आपण कोणाचीही नावे सार्वजनिक करणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.“ कोण सहभागी आहे याऐवजी कोण सहभागी नाही हे विचारा. मी नावं सांगायला सुरुवात केली तर वरून सुरुवात करावी लागेल. मला ते करायचे नाही,” असंही ते हसत म्हणाले. पारोल गावातील मोहिंदर बाग येथील त्यांच्या फार्महाऊसवर निवडक माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.