पेठ वडगाव / प्रतिनिधी
जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पेठवडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री व आमदार विनय कोरे, माजी मंत्री व आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार डॉ. सुचित मिणचेकर यांच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे.त्यामुळे या बाजार समितीवर समझोता एक्सप्रेसचे निर्विवाद सत्ता येण्याची
चिन्हे आहेत.
कृषी पत संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था गटात (सर्वसाधारण) – सुरेशपाटील (पुलाची शिरोली), बाळकृष्ण बोराडे (चावरे), आण्णासो डिग्रजे(रूकडी), विलासराव खानविलकर (रेंदाळ), जगोंडा पाटील (चंदूर), किरण इंगवले (हातकणंगले), शिवाजी पाटील (टोप), महिला संचालक – भारती चौगुले (आळते),वैशाली नरंदेकर (सावर्डे), इतर मागासवर्गीय गट – चाँद मुजावर (कुंभोज),विमुक्त जाती भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग – धुळगोंडा डावरे (पट्टणकोडोली), ग्रमपंचायत मतदार संघ (सर्वसाधारण), अभय उर्फ राजू मगदूम (माणगाव), सुनीता चव्हाण (तळसंदे), आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट – वसंतराव खोत (निलेवाडी), अनुसूचित जाती जमाती गट – नितीन कांबळे (माणगाव), अडते व व्यापारी गट – सागर मुसळे (इचलकरंजी), संजय वठारे (इचलकरंजी), हमाल व मापाडी गट – नितीन चव्हाण (सावर्डे) या सर्व १८ उमेदवारांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली आहे. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत तशीच राहिली आहे. त्यामुळे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व उमेदवारांची घोडदौड सुरू आहे.









