प्रतिनिधी /मडगाव
हावेरी – कर्नाटक येथील आरोपीला करमणे गावात अमलीपदार्थ जवळ बाळगल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश गंगाधर दासूर (21) असे मूळ हावेरी कर्नाटक येथील हा आरोपी सध्या हा आरोपी गोव्यात शिर्ली येथील एका व्यक्तीच्या घरात राहात होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
या आरोपीकडून पोलिसांनी गांजा सदृष्य सुमारे 1.32 लाख रुपये किंमतीचा पदार्थ जप्त केला अशी माहिती कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपा देयकर यांनी दिली. आरोपीला अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या 20 (ब)(2)(ब) कलमाखाली गुन्हा नोंद करुन अटक केली आहे.









