क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेली गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील साळगावकर फुटबॉल क्लब आणि चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्स क्लब यांच्यातील गोलशून्य बरोबरीत संपली. काल हा सामना जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आला. पूर्ण वेळेत चर्चिल ब्रदर्स क्लबच्या क्लेंसियो पिंटोने पहिल्या सत्रात दोन वेळा गोल करण्यात यत्न थोडक्यात हुकले. साळगावकर फुटबॉल क्लबसाठी चैतन कोमरपंत याचा खेळ उठावदार झाला. साळगावकरचे दुसऱया सत्रात वर्चस्व आढळून आले. या बरोबरीने साळगावकर एफसी आणि चर्चिल ब्रदर्स क्लबला प्रत्येकी एक गुण मिळाला.








