कोल्हापूर चित्रपट सृष्टीतील चालता – बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड; उद्या अंत्यसंस्कार
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठी नाटÎ, चित्रपटपट सृष्टीतील बहुआयामी व्यक्तीमत्व, ज्येष्ठ कलाशिक्षक, कलासमीक्षक, दिग्दर्शक आणि कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत दत्तात्रय जोशी वय 77, रा. महाव्दार रोड यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. तीन दिवसांपूर्वी त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या स्मरणार्थ चित्रपट महोत्सव यशस्वीरित्या आयोजित केला होता. रविवारी या महोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी यांचे ते वडील होत. मंगळवारी सकाळी जोशी यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 9ः30 वाजता त्यांच्या महाव्दार रोडवरील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.
कला, नाट्य, चित्रपटसृष्टीशी शेवटपर्यंत नाते
कोल्हापुरातील प्रसिद्ध न्यू हायस्कूलमध्ये जोशी यांनी कलाशिक्षक म्हणूनही सुरूवात केली. चित्रकला शिकविणाऱया जोशी सरांनी असंख्य चित्रकार तयार केले. चित्रकलेबरोबरच नाटÎ आणि चित्रपटसृष्टीशीही जोशी यांनी नाते जोडले ते शेवटच्या श्वासापर्यंत जपले. कलानगरी कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक आणि चित्रपट चळवळ रूजावी यासाठी त्यांनी कृतीशिल प्रयत्न केले. ते यशस्वीही करून दाखवले. कलानिकेतन या संस्थचे अध्यक्षपद सांभाळणाऱया जोशी यांनी कला महर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचेही अध्यक्षपदही भूषविले. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचे संचालक म्हणून प्रारंभीच्या काळात त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.
चित्रपटांची चळवळ रूजविण्यासाठी त्यांनी कोल्हापूर फिल्म सोसायटीची स्थापना करून विविध चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले. गेली दशकभर चंद्रकांत जोशी आणि दिलीप बापट ही जोडी या महोत्सवाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती. शिवाजी विद्यापीठातील संगीत व नाटÎशास्त्र विभागाच्या स्थापनेतही त्यांचे योगदान आहे. या विभागाचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 1979-80 च्या दरम्यान कोल्हापुरात झालेल्या अखिल भारतीय नाटÎसंमेलनाच्या आयोजनात त्यांचा पुढाकार होता. विविध कला, सांस्कृतिक आणि नाटÎ विषयक संस्थांचे मार्गदर्शक होते.
संवेदनशिल आणि कल्पक दिग्दर्शक
जोशी यांनी निवडक चित्रपट दिग्दर्शित केले. पण त्यामध्ये आपली वेगळी छाप पाडली होती. जगतजननी महालक्ष्मी हा पौराणिक चित्रपट तर टक्कर आणि निर्मला मच्छिंद्र कांबळे हे सामाजिक चित्रपट, हिंदीतील सूत्रधार हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. `लोकराजा शाहू छत्रपती’ या मालिकेसाठी कलादिग्दर्शक आणि वेशभूषाकार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.
विविध पुरस्कारांनी सन्मान
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने 2002 मध्ये जोशी यांना जीवनसंध्या तसेच बळीराम बिडकर पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच त्यांना इतरही संस्थांनी पुरस्काराने सन्मान केला.
कोल्हापूरकरांना चित्रपट पहायला लावणारा माणूस
चंद्रकांत जोशी यांनी दिलीप बापट या आपल्या जीवलग मित्र आणि सहकाऱयाच्या मदतीने कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीच्या माध्यमातून विविध देशातील, भाषांतील समांतर, कलात्मक आणि वेगळा आशय, विचार मांडणारे चित्रपट दाखवून कोल्हापूरकारांना अक्षरशः चित्रपट पहायला लावले, जोशी-बापट जोडीमुळे महोत्सवातील चित्रपट पाहणारा एक चित्रपटरसिक वर्ग कोल्हापूरमध्ये तयार झाला. त्यांच्या निधनाने कला, सांस्कृतिक आणि सिनेसृष्टीची न भरून निघणारी हानी झाली आहे, अशा शब्दात मान्यवरांनी भावना व्यक्त करत जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सूत्रधार : कोल्हापुरात बनलेला पहिला हिंदी चित्रपट
महान अभिनेत्री स्मिता पाटील अभिनीत `सूत्रधार’ हा हिंदी चित्रपट चंद्रकांत जोशी यांनी दिग्दर्शित केला होता. विशेष म्हणजे कोल्हापुरात तयार झालेला पहिला हिंदी चित्रपट ठरला.
बेळगावशी आपुलकीचे नाते
चंद्रकांत जोशी यांचे बेळगावच्या कला, सांस्कृतिक जगताशी आपुलकीचे नाते होते. या ठिकाणी होणाऱया चित्रकला प्रदर्शन असो वा सांस्कृतिक कार्यक्रम असो. जोशी यांची मार्गदर्शक म्हणून उपस्थिती निश्चित असे. बेळगावचे महान चित्रकार के. बी. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जोशी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले होते. दोन महिन्यांपूर्वी 25 ऑक्टोबरला त्यांनी बेळगावमध्ये झालेल्या `रंगभूल’ या चित्रकार सूर्यकांत निंबाळकर आणि कविता आर. चिकोडे यांच्या निसर्ग प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले होते.
चंद्रकांत जोशी यांच्याशी आमचा स्नेह होता. 25 ऑक्टोबरला चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी बेळगावला होते, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी लाभली. तासभराचे त्यांचे भाषण अत्यंत प्रभावी झाले होते. त्यांच्याबरोबर कलाविषयक उपक्रम राबविण्याचा मानस होता. त्यांच्या निधनाने कला, नाटÎ आणि चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. – किरण ठाकुर, समूह प्रमुख, सल्लागार संपादक, `तरुण भारत’
गेल्या 45 वर्षापासून माझी आणि जोशी यांची घनिष्ठ मैत्री होती. कोल्हापुरच्या चित्रपट सृष्टीत 22 वर्षापासून सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबत काम केले. कोल्हापूकरांनी वेगळÎा धाटणीतील चित्रपट पाहावे, कलानगरीत चित्रपट चळवळ रूजावी, यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केले. त्यांच्या निधनाने फिल्म सोसायटीचा आधार गेला. – दिलीप बापट, सेक्रेटरी, कला महर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी








