आमदार शिवेंद्रराजेंचे नाव न घेता उदयनराजेंकडून खरपूस समाचार
प्रतिनिधी/ सातारा
निवडणूका आल्या की आम्ही जाहीरनामा काढत नाही तर वचननामा काढतो. आज आम्ही वचननाम्यातील एकूण एक मुद्दे पूर्ण केलेत किंबूहुना त्याहीपेक्षा जास्त कामे केली आहेत, अशी ग्वाही देत मी नारळ फोडय़ा तर तुम्ही घरफोडय़ा अशा शब्दात खासदार उदयनराजेंनी नाव न घेता आमदार शिवेंद्रराजेंचा खरपूस समाचार घेतला. तुमच्याकडे, घराण्याकडे बघून लोकांनी पैसे तुमच्या बँकेत ठेवले. वडिलांचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद आहे, असे मत खासदार उदयनराजेंनी व्यक्त केले. दरम्यान, सातारा विकास आघाडी आणि ऍड. बनकर यांचे तोंड भरुन कौतुक केले.
कास धरणाची घळ भरणी आणि रस्त्याच्या कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, नगरसेवक वसंत लेवे, निशांत पाटील, किशोर शिंदे, सुजाता राजेमहाडिक, राजू भोसले, श्रीकांत आंबेकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सुनील काटकर, अभियंता दिलीप चिद्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, आजचा हा क्षण सुवर्ण अक्षरांनी घेण्यासारखा क्षण आहे. थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्वतःच्या खर्चातून कास धरण बांधले. अनेक वर्षापासून आमचे वडिल कै. प्रतापसिंहराजे यांचे जे स्वप्न होते, संपूर्ण सातारा शहराला पाईपलाईनमधून पाणी पुरवठा झाला पाहिजे. त्यावेळे मी कुठल्या पदावर नव्हतो. मात्र, मी स्वप्न पूर्ण करु शकलो. वडिलांचे स्वप्न साकारण्यात यशस्वी झालो यात मला आनंद आहे, असे सांगितले.
बनकरांचे आणि सातारा विकास आघाडीचे कौतुक
उदयनराजे हे भाषणात पुढे म्हणाले, काळा को. लोकांनी व्यवसाय करायचा की नाही?. तुमची नजर लागली अन काळा कोट पण फाटला. नाहीतर बनकर काळा कोट घालून असते. बोलताना सुध्दा मला स्वतःचीच लाज वाटते की आज हे बोलावे लागले. संबंधित लोकांना कळायला पाहिजे, नाव ठेवणे फार सोप असते. आजपर्यंत एवढी वर्ष सत्ता तुमच्या हातात आह। काय केल सातारा शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी. त्यांनी एकदा सांगू द्या, जाहीर ऑडिट संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात करु द्या. आम्ही नेहमी जाहीर ऑडीट करतो. बोर्ड लावतो हे केले ते केले. आम्ही ज्या वेळेस निवडणूकीला लोकशाही पद्धतीने सामोरे जातो. त्यावेळेस आम्ही जाहीरनामा काढत नाही तर वचननामा काढतो. आज वचननाम्यातील एकूण एक मुद्दे पूर्ण केले. त्याच्यापेक्षा जास्त कामे केली, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सातारा विकास आघाडी मजबूत
सातारा विकास आघाडीचे जेवढे पदाधिकारी व हितचिंतक आहेत ते आज एका विचाराने मनाने एकत्र आहेत. तुम्ही ज्यावेळेस माणसांना बळजबरीने एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करता. तेवढय़ापुरते एकत्र येतात आणि काम झाल्यानंतर वेगवेगळया दिशेने वाटचाल करतात. ही आमची ख्याती नाही, आमची ख्याती आहे एकत्र राहण्याची. प्रत्येक वेळेस नाव ठेवणाऱया घरफोडय़ांनी जरा मागे वळून बघावे, काय दुदर्शा त्या लोकांची झालेली आहे, असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा माधवी कदम नियोजित कार्यक्रमात व्यस्त
कास धरणाच्या घळभरणीचा कार्यक्रम सातारा विकास आघाडीने अचानक ठरवला. त्यामूळे नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासह काही पदाधिकारी ही नियोजन केल्याप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होत्या. माधवी कदम यांनी कार्यक्रमाला येणार नाही याची कल्पना पाणी पुरवठा सभपती सीता हादगे यांना दिली होती, अशीही चर्चा सुरु होती.
हो आम्ही नारळ फोडतो
पुढे ते म्हणाले, लहान मुल परवडली, लहान मुलांपेक्षा त्यांची बुद्धी कमी झाली आहे. आम्हाला नारळ फोडी गँग म्हणतात, हो सार्थ अभिमान आहे आम्हाला आमचा. का तर आम्ही लोकांच्या हिताची काम करतो. कामे केली म्हणून आम्ही नारळ फोडतो. एवढे पर्सनल लेव्हलला जाणे मी माझ्या लेव्हलच्या कमी समजतो. पण फार वैयक्तिक पातळीवर दिशाहिन झालेले अत्यंत संकुचित वृत्तीचे काही लोक असतात. त्यांच्याकडून फार अपेक्षा करणे बरोबर ठरत नाही. घरगुती असेल सार्वजनिक असेल आपण नेहमी नारळ वाढवतो. ती एक प्रथा व पद्धत आहे. आम्ही कधीही कोणाची घर फोडली नाहीत. ज्या लोकांनी विश्वासांनी स्वतःच्या आयुष्यांची कमाई काही लोकांच्या घराण्याकडे बघून त्यांच्या बँकांमध्ये ठेवली. आज त्यांची अवस्था काय आहे. शाहुनगरसाठी आज जवळपास 35 कोटींचा निधी तसेच उरलेल्या निधीसाठी केंद्रीय मंत्र्यांशी बेलणे झाले. त्यानासर बजेटमध्ये तरतूद करुन अदा केला जाईल.








