प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात दत्त जयंती भक्तीभावाने साजरी करण्यात आली. दत्त मंदिरांमध्ये सर्वत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चा गजर सुरू होता. दत्त मंदिरांवरती विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासुनच भाविकांनी दत्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली.
पूजा, अभिषेक, आरती आदी धार्मिक विधी पार पडले. दुपारी महिलांच्या उपस्थितीत दत्त जन्मोत्सव झाला. या निमित्ताने मंदिर परिसरामध्ये फुल, श्रीफळ, हार, कापूर, उदबत्ती यांचे स्टॉल विपेत्यांनी मांडले होते.
गेंधळी गल्ली सार्वजनिक श्री दत्त जयंती उत्सव मंडळातर्फे दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात आला सकाळी 4 वा. अभिषेक, रात्री 9 वा. संगीत खुर्ची कार्यक्रम, रात्री 8 वा. महा आरती, राजेश सावंत, सुरेश शिंदे, शंकर पावशे, सुनिल बांदेकर, विजय रेवाले, अमित किल्लेकर, आक्काताई महिला भजनी मंडळातर्फे पाळणा गीत सादर करण्यात आले.









