अमेठी / वृत्तसंस्था
लोकसभा निवडणूक-2019 मध्ये अमेठीतून पराभूत झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी शुक्रवारी अमेठी येथे पोहोचले. आपल्या अमेठी भेटीत त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमवेत काँग्रेस प्रतिज्ञा पदयात्रेत सहभाग घेतला. याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचाही समाचार घेतला. अमेठीतील जगदीशपूरच्या रामलीला मैदानापासून काँग्रेसच्या प्रतिज्ञा पदयात्रेला सुरुवात झाली. ज्यामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांच्यासह खासदार राहुल गांधी यांनीही सुमारे सहा किलोमीटरची पदयात्रा केली. या पदयात्रेचा उद्देश अमेठीच्या पाच विधानसभा जागांवर काँग्रेसला मजबूत करणे हा आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीवरून राज्यात वातावरण तप्त होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी सध्या अमेठीच्या दौऱयावर आहेत. हिंदू पूर्ण आयुष्यभर सत्याच्या वाटेने चालतात. सत्य शोधणे आणि त्याच्यासाठी लढण्यात हिंदू आपले आयुष्य वाहून देतात, असा दावाही त्यांनी केला.









