गॅस सिलिंडर दुर्घटनेनंतर बँकेची इमारत कोसळली
कराची / वृत्तसंस्था
पाकिस्तानातील कराची शहरात शनिवारी एका इमारतीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून 13 हून अधिक जखमी झाले आहेत. हा स्फोट गॅस सिलिंडरमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज स्पष्ट करण्यात आला असून स्फोटामुळे बँकेची इमारत कोसळली आहे. याशिवाय एका पेट्रोल पंपाचेही नुकसान झाले आहे. कराची प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून मदत व बचावकार्य करत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली होती.









