फ्रान्सकडून इंग्लंडच्या पर्यटकांबाबत नवे निर्बंध होणार लागू
पॅरीस
फ्रान्समध्ये कोणी जाऊ इच्छित असेल तर सध्या फ्रान्स सरकारने ओमिक्रॉनच्या धर्तीवर त्यांच्यासाठी नवे निर्बंधाचे नियम जारी करण्याची योजना आखली असल्याची माहिती आहे. इंग्लंडमधून फ्रान्समध्ये येणाऱया पर्यटकांना काटेकोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉनच्या व्हेरियंटच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर फ्रान्स सरकारने सुरक्षेच्या उपायाखातर नवे नियम लादले जाणार असल्याची माहिती आहे. फ्रान्समधील रहिवासी इंग्लंडमध्ये गेलेल्यांना व नेमके कारण सांगणाऱयांना फ्रान्समध्ये प्रवेश असणार असल्याचे समजते. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी युरोपमध्ये ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त केली असून देशवासियांना यासंदर्भात खबरदारी घेण्याची सुचना दिली आहे. योग्य कारणासाठी दोन्ही देशात येणाऱयांना परवानगी यापुढे असणार आहे. पर्यटन वा व्यवसायानिमित्त काढण्यात येणाऱया दौऱयांना परवानगी नसणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.









