कोल्हापूर / प्रतिनिधी
कर्नाटकातील बेंगळूरमध्ये युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळÎाची विटंबना करण्याचा प्रकार शुक्रवारी घडल्यानंतर त्याचे राज्यभर संतप्त पडसाद उमठत आहेत. सर्व राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला. सोशल मीडियावरूनही शिवप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही या घटनेबद्दल इतिहासाची जाणीव करून देत निषेध केला आहे. आपल्या टविट्मध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळÎाची बेंगळूर येथे झालेली बिटंबना निषेधार्ह आहे. बेंगळूरची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली होती, याची जाण ठेवली पाहिजे. केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारने या प्रकाराची गांभिर्याने दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.