वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
चीनमध्ये वेठबिगारी पद्धत अद्यापही अस्तित्वात आहे. ही पद्धत मानवाधिकारांच्या संकल्पनेच्या विरोधात असल्याने चीनवर आयातबंदी घालावी, असा प्रस्ताव अमेरिकेच्या वरीष्ठ सभागृहात (सिनेट) संमत करण्यात आला आहे. या प्रस्तावाला रिपब्लिकन आणि डेमॉपेटिक अशा दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्याने तो एकमताने संमत करण्यात आला. चीनच्या हय़ुगुर प्रांतात चाललेल्या मानवाधिकार हननाचा मुद्दाही या प्रस्तावात होता. हा प्रस्ताव आता अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांच्याकडे जाणार असून ते स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास चीनच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.









