ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
सध्या केंद्र सरकार लग्नासाठी मुलींचं लग्नाचं वय १८ वर्षे वरुन किमान २१ वर्षे करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाऊन ते पारित करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रीया देत नरेंद्र मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे.तसेच, या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
यावर बोलताना मलिक यांनी स्त्री-पुरुषांच्या वयामध्ये लग्नासाठी अंतर असायला हवं, असं मत व्यक्त केलं आहे. १८ वर्षांत व्यक्तीला सज्ञान होते. मग लग्नासाठी महिलांचं वय २१ केलं तर पुरुषांचं वय २५ केलं जाईल का ? पती-पत्नीमध्ये वयाचं अंतर असायला हवं” ही नवाब मलिक यावेळी म्हणाले. तसेच लग्नाचे वय बदलण्याची गरज नसल्याचे ही मत मलिक यांनी स्पष्ट केलं.व्यक्ती सज्ञान १८ वर्षी होते. तर त्यांना आपल्या विवाहाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
त्यांच्या परवानगीशिवाय कोणताही विवाह देशात होऊ शकत नाही. मग असं तर नाही ना, की लोकांनी लग्नच करू नये, या दिशेने मोदी सरकार देशाला घेऊन जायचा प्रयत्न करतंय ? कारण अविवाहित लोकांच्या हातात देश आहे. आणि लग्नाविषयी ते गंभीर नाहीत”, असा ही खोचक टोला मलिक यांना लगावला.