प्रतिनिधी /बेळगाव
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या चेअरमनपदी विजेंद्र गुंडी यांची निवड करण्यात आली. विद्यमान कार्याध्यक्ष सुहास कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या 11 ऑक्टोबर रोजी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे चेअरमन नरहरी उर्फ एन. डी. जोशी यांचे आकस्मिक निधन झाल्याने चेअरमनपदाची जागा रिक्त होती. त्या ठिकाणी विजेंद्र गुंडी यांची निवड करण्यात आली. विजेंद्र गुंडी यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी दोन मिनिटे शांतता पाळून स्व. एन. डी. जोशी व बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनामुळे आमची कधीही भरून न येणारी हानी झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी सुहास कुलकर्णी, सेपेटरी विनायक जोशी व संघाचे संचालक उपस्थित होते. सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन विजेंद्र गुंडी यांनी दिले. विनायक जोशी यांनी आभार मानले.









