वृत्तसंस्था/ जकार्ता
इंडोनेशियात मंगळवारी पहाटे 3.20 वाजता 7.6 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत 75.9 किलोमीटर खोलवर होता. या भूकंपानंतर इंडोनेशियाने फ्लोरेस समुद्राच्या किनारी भागात त्सुनामीचा इशारा दिला आहे. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर ऑफ द नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशननुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 100 किलोमीटर अंतरापर्यंत त्सुनामीचा लाटा पोहोचण्याची भीती आहे. यापूर्वी शनिवारी रात्री इंडोनेशियाच्या मालुकू प्रांतात 5.6 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता.









