प्रतिनिधी / दापोली
दापोली नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत झालेल्या बंडखोरीला जबाबदार धरून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी नवीन हंगामी कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामुळे शिवसेनेत मोठी उलथापालथ झाली आहे.
यामध्ये उपजिल्हा प्रमुख म्हणून राजू निगुडकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून किशोर देसाई, तालुका प्रमुख म्हणून ऋषिकेश गुजर, शहर प्रमुख म्हणून संदीप चव्हाण व उपशहर प्रमुख म्हणून विक्रांत गवळी यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी दापोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे, शिवाय या पदावर असणाऱ्या पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांना आपण बाजूला करत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.