हरयाणातील गुरुग्रामच्या सेक्टर ३७ मधील मोकळ्या जागेत शुक्रवारच्या नमाज अदा करण्यावर अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गुरुग्राममध्ये खुल्या जागेवर नमाज पठण केलेलं खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. यांनतर आता बिहारमध्येही भाजप नेत्याने खुल्या जागेवर नमाज पठण बंद करण्याला पाठिंबा दिला आहे. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे.
दरम्यान, खुल्या जागेवर नमाज पठण करण्यास हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी विरोध दर्शविला होता. यांनतर बिहारच्या राज्य मंत्रीमंडळातील एका भाजप नेत्याने रस्त्यावरील नमाज पठण बंद करण्याच्या मागणीचे समर्थन केले होते. त्यावरुन, मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना, या गोष्टी निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच, या विषयाला मुद्दा बनवण्यात काहीही अर्थ नाही. आमच्यासाठी सर्वच नागरिक एकसमान आहेत. सर्वांनी आपल्या पद्धतीने या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. तसेच एखादा व्यक्ती कोठे पूजा-आरती करतो, गाणे गातो ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. सर्वांचे स्वतंत्र विचार आहेत, त्यामुळेच सर्वांनी आपल्या पद्धतीने अनुकरण करावे हे मी मानतो असेही कुमार यांनी स्पष्ट केलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









